“आम्ही एकशेपाच आहोत”
शेतकऱ्यांना भेटायला मोटारीतून जाऊ नये, पायी गेले पाहिजे. आम्ही खेडेगावात इतके फिरलो की, आमचा अवधा वीस रुपये खर्च झाला. मराठे, ब्राह्मण वेगळे असले तरी लढाईचे वेळेस आम्ही एकशेपाच आहोत. आमचे बरोबर पथकात पोवाडे म्हणणारे व्हॉलंटियर्स होते. आम्ही पंधरावीस मंडळी झेंडा घेऊन प्रत्येक गावी जात होतो, गावात दूध मिळणे मुष्कील होई. खेड्यातील कुणब्याची भाषा आली पाहिजे. …